Ezekiel 12:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तू त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, मी या पुढे अजिबात उशीर करणार नाही. मी जे घडेल असे म्हणतो, ते घडेलच.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता त्यांना सांग: प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही; मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझा कोणताही शब्द आणखी विलंब करणार नाही; जेव्हा मी ते बोलेन ते पूर्णतेस जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव त्यांना सांग परमेश्वर देव असे म्हणतो; माझ्या शब्दाला उशीर होणार नाही, जो शब्द मी बोललो तो पूर्ण करणार आहे, हे परमेश्वर देव जाहीर करत आहे.