Ezekiel 12:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून, मानवपुत्रा, सामान बांध, देशी जात असल्याचे नाटक कर. लोक तुला पाहत असताना हे कर. कदाचित ते तुला पाहतील पण ते फार बंडखोर आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यास लागणारी सामग्री सिद्ध कर, व भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा; त्यांच्यादेखत आपले ठिकाण सोडून दुसर्‍या ठिकाणी जा; न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल; ते तर बंडखोर घराण्यातले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून, हे मानवपुत्रा, निर्वासित होऊन जाण्यास तू आपले सामान बांध आणि दिवसाच्या प्रकाशात ते तुला पाहत असताच तू जिथे आहेस तिथून नीघ आणि दुसर्‍या ठिकाणाकडे जा. जरी ते बंडखोर लोक आहेत, तरी कदाचित ते समजतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि मानवाच्या मुला तुझ्यासाठी सर्व काही हद्दपार करण्याची तयारी कर, आणि त्यांच्या डोळ्यांदेखत बाहेर निघून जा, मी तुला तुझ्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणावर हद्दपार करीन. कदाचित त्यांना कळून येईल ते फितुर घराण्यातले आहेत.