Ezekiel 12:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुझे सामान भरदिवसा बाहेर काढ म्हणजे लोकांना ते दिसू शकेल. संध्याकाळी, तू दूरच्या देशात कैदी म्हणून जात असल्याचे नाटक कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देशांतरास जाताना सामग्री बाहेर काढतात तसे तू भरदिवसा त्यांच्यादेखत आपले सामानसुमान बाहेर काढ, व देशांतरास निघतात तसा संध्याकाळी त्यांच्यादेखत निघून जा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिवसाच्या प्रकाशात, ते तुला पाहत असता निर्वासित म्हणून जाण्यास तू बांधलेले आपले सामान आण आणि संध्याकाळी ते पाहत असता, निर्वासित जाण्यास निघतात त्यांच्यासारखा तू बाहेर जा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तू बाहेर हद्दपार जातांना आपल्या वस्तू दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्यांदेखत घेऊन जाशील; बाहेर हद्दपार होतांना सायंकाळी त्यांच्या नजरे देखत निघून जा.