Ezekiel 12:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी (यहेज्केलने) देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व केले. दिवसा मी माझे सामान बांधले व मी दूर देशी जात असल्याचे दाखविले. त्या दिवसाच्या सांध्याकाळी, मी हाताने भिंतीत भोक पाडले व रात्री सामान खांद्यावर टाकून गाव सोडले. सर्व लोक मला पाहत आहेत असे पाहूनच मी हे सर्व केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मला आज्ञा झाली तसे मी केले; देशांतरास लागणारी सामग्री नेतात तसे मी भरदिवसा आपले सामानसुमान बाहेर काढले व संध्याकाळी मी तटास आरपार भोक पाडले; अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले व त्यांच्यादेखत ते मी खांद्यावर घेतले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मला आज्ञा दिली त्याप्रमाणे मी केले. निर्वासित म्हणून जाण्यासाठी दिवसाच्या वेळी मी माझे सामान बाहेर आणले. मग संध्याकाळी माझ्या हाताने मी भिंत खोदली. अंधार पडायला लागला तेव्हा लोक पाहत असता माझ्या खांद्यावर मी माझे सामान वाहून घेतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी हे केले, जसे तू मला बजावले, दिवसा ढवळ्या मी सर्व वस्तू बाहेर हद्दपार आणल्या, आणि सायंकाळी आपल्या हातांनी वेशीला भगदड पाडले. मी माझ्या सर्व वस्तू अंधारात बाहेर काढल्या आणि त्यांच्या डोळ्यांदेखत सर्व आपल्या खांद्यावर घेऊन आलो.