Ezekiel 13:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ते खोटे संदेष्टे पुन्हा पुन्हा माझ्या लोकांशी खोटे बोलले. त्यांनी ‘शांती प्रस्थापित होईल.’ असे सांगितले. पण तेथे शांती नाही. भिंतीची चांगली दुरुस्ती करुन लोकांनी लढायला सज्ज होण्याची जरुरी आहे. पण त्याऐवजी लोक भिंतीना फक्त गिलावा करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याचे कारण हेच की त्यांनी माझ्या लोकांना बहकवले आहे, शांती नसता ‘शांती आहे’ असे त्यांनी म्हटले आहे आणि माझे लोक तट बांधत असता, पाहा, त्याला ते कच्चा चुना लिंपीत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘कारण जरी शांती नसली तरी ते माझ्या लोकांना, “शांती” असे म्हणत बहकवितात, कारण कच्ची भिंत बांधून ते त्यावर चुन्याचा लेप लावतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव माझ्या लोकांस भलतीकडेच जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांना शांती दिली जेथे शांती नव्हती, त्यांनी वेशी उभ्या केल्या आहे. आणि त्यांना पांढरा रंग दिला आहेत.