Ezekiel 13:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ह्या सर्व गोष्टी इस्राएलच्या खोट्या संदेष्ट्यांबाबत घडतील. ते यरुशलेमच्या लोकांशी बोलतात. ते शांतीचे भाकीत करतात. पण शांती मिळत नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभुने, हे सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या संदेष्ट्यांनी यरुशलेमेविषयी संदेश दिला व शांती नसता शांती आहे असा दृष्टान्त सांगितला ते तुम्ही नष्ट झाला आहात, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलचे ते संदेष्टे ज्यांनी यरुशलेमविषयी भविष्यवाणी केली आणि शांती नसतानाही शांती विषयी दृष्टान्त पाहिले त्यांच्याविषयी सार्वभौम याहवेह असे जाहीर करतात.” ’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाचे भाकित करणारे ज्यांनी यरूशलेमची भविष्यवाणी केली ज्यांनी तिच्या शांतीचा दृष्टांत पाहिला, पण तेथे शांती नाही. हे परमेश्वर देव जाहीर करीत आहे.