Ezekiel 13:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“परमेश्वर, माझा प्रभू, ह्या गोष्टी सांगतो. स्त्रियांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही कापडाच्या पटृ्या करुन लोकांना बांगड्यांप्रमाणे घालायला देता, डोक्याला बांधण्यासाठीही विशेष प्रकारचे पट्टे करुन देता. तुम्ही लोकांना सांगता की ह्या गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्याचे नियंत्रण करण्याची जादूची शक्ती आहे. स्वत:ला जगविण्यासाठी तुम्ही लोकांना अशा रीतीने जाळ्यात पकडता!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना सांग: प्रभू परमेश्वर म्हणतो, लोकांच्या प्राणांची पारध करावी म्हणून ज्या तुम्ही प्रत्येक कोपराला पट्ट्या शिवून लावता, व निरनिराळ्या उंचीच्या मनुष्यांच्या डोक्यांसाठी जाळ्या तयार करता, त्या तुम्ही हायहाय म्हणाल. तुम्ही माझ्या लोकांच्या प्राणांची पारध करता, पण स्वतःच्या प्राणांचा बचाव करता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सांग, “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या स्त्रिया आपल्या मनगटांवर जादूच्या ताईत शिवून बांधतात आणि लोकांना फसविण्यासाठी आपल्या डोक्यासाठी वेगवेगळ्या लांबीचे बुरखे तयार करतात, त्या स्त्रियांचा धिक्कार असो. आपला जीव वाचवावा म्हणून तुम्ही माझ्या लोकांचा जीव पाशात टाकता काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सांग, परमेश्वर देव हे म्हणतो; लोकांच्या जीवाची पारध करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पाश मांडून ठेवले आहेत, निरनिराळ्या मनुष्यांच्या उंचीच्या जाळ्या बनवतील तेव्हा तुम्ही हळहळ व्यक्त करून माझ्या लोकांच्या जीवाची शिकार करता, पण स्वतःला वाचवता.