Ezekiel 13:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही मला लोकांच्यापुढे क्षुद्र बनविता. तुम्ही ओंजळभर सातू व भाकरीच्या काही तुकड्यांसाठी त्यांना माझ्याविरुद्ध फिरविता. माझ्या लोकांशी तुम्ही खोटे बोलता. त्या लोकांना खोटे आवडते. तुम्ही ज्यांनी जगायला पाहिजे त्यांना मारता आणि ज्यांनी मरायला पाहिजे, त्यांना जगविता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लबाडीस कान देणार्या माझ्या लोकांना तुम्ही लबाडी सांगून, जे मरू नयेत त्यांना मारून व जे जगू नयेत त्यांना वाचवून मूठभर जवासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही माझ्या लोकांसमोर माझा अवमान केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मूठभर जवासाठी आणि भाकरीच्या तुकड्यांसाठी माझ्या लोकांमध्ये मला अपवित्र केले आहे. जे माझे लोक लबाड्या ऐकतात, त्यांच्याशी तुम्ही खोटे बोलला आहात, ज्यांनी मरू नये अशांना तुम्ही मारून टाकले आणि ज्यांनी जगू नये अशांना तुम्ही वाचविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोट्या गोष्टी ऐकून, जे मरु नये त्यांना ठार करून जे जगू नये त्यांना जगवून त्यांच्या अन्नांसाठी माझ्या लोकांचा अवमान केला आहे.