Ezekiel 13:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर, प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो, तुम्ही बांगड्यासारखे कापडी पट्टे करुन लोकांना सापळ्यात पकडू बघता पण मी त्यांना मुक्त करीन. तुमच्या हातातील ते कापडी पट्टे मी फाडून टाकीन, म्हणजे ते लोक पिंजऱ्यातून सोडून दिलेल्या पाखराप्रमाणे स्वतंत्र होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, ज्या पट्ट्या बांधून तुम्ही पक्ष्यांप्रमाणे पारध करता, त्यांची मी वाट लावीन; मी तुमच्या बाहूंवरून त्या पट्ट्या फाडून काढीन आणि ज्या आत्म्यांची तुम्ही पक्ष्यांप्रमाणे पारध करता, त्यांना मुक्त करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जादूचे जे ताईत ज्याद्वारे तुम्ही माझ्या लोकांना पक्ष्यांसारखे फसविता, त्याविरुद्ध मी आहे आणि ते मी तुमच्या मनगटांवरून काढून टाकेन; तुम्ही पक्ष्यांप्रमाणे फसविलेल्या लोकांना मी मुक्त करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यास्तव परमेश्वर देव म्हणतो, पाहा ज्या पक्षाच्या पारधासाठी पाश मांडला आहे त्यास तोडून मी मार्ग करीन,