Ezekiel 13:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ह्यापुढे तुम्हाला तुमचे निरर्थक दृष्टान्त दिसणे बंद होईल तुम्ही जादूही करणार नाही. तुमच्यापासून मी माझ्या लोकांचे रक्षण करीन. मग तुम्हाला कळेल की मीच खरा परमेश्वर आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून ह्यापुढे तुमचे निरर्थक दृष्टान्त पाहणे व तुमचे शकुन पाहणे बंद होईल; आणि मी आपले लोक तुमच्या हातांतून सोडवीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून यापुढे तुम्ही खोटे दृष्टान्त पाहणार नाही किंवा शकुन करणार नाही. माझ्या लोकांना मी तुमच्या हातून सोडवेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून विनाकारण दर्शन बघणे व ज्योतिषी हे संपुष्टात येईल; मी आपले लोक तुमच्या हातून सोडवेन, तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.