Ezekiel 13:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने त्यांना पाठवले नसता, ही परमेश्वराची वाणी असे म्हणणारे पोकळ दृष्टान्त व खोटा शकुन पाहतात; आणि शकुनाप्रमाणे खरोखर घडेल अशी आशा धरतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे दृष्टान्त खोटे आहेत आणि त्यांचे शकुन लबाड आहेत. जरी त्यांना याहवेहने पाठवले नाही, तरी ते म्हणतात, “याहवेह जाहीर करतात,” आणि याहवेहने त्यांच्या शब्दाची पूर्तता करावी अशी अपेक्षा बाळगतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांस खोटा दृष्टांत आणि खोटे भाकीत कळले आहे, जो कोणी म्हणतो परमेश्वर देव अमुक तमुक जाहीर करीत आहे. परमेश्वर देवाने त्यांना पाठवले नसतांनाही त्यांनी लोकांस आशा दिली आहे, आणि त्यांनी दिलेला संदेश खरा ठरेल.