Ezekiel 14:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, माझा त्याग करणाऱ्या आणि पाप करणाऱ्या राष्ट्रांला मग ते राष्ट्र कोणतेही असो मी शिक्षा करीन. त्यांचा अन्न पुरवठा मी बंद करीन. मी कदाचित् देशात दुष्काळ पाडीन व लोक व प्राणी यांना देशातून बाहेर काढीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, एखाद्या देशाने विश्वासघात करून माझ्याविरुद्ध पातक केल्यास मी त्यावर आपला हात चालवीन, त्याच्या अन्नाचा आधार तोडीन, देशात दुष्काळ पाडीन, आणि त्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे मानवपुत्रा, जर एखाद्या देशाने अविश्वासू राहून माझ्याविरुद्ध पाप केले आणि त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यास व त्यावर दुष्काळ आणून त्यातील लोक व जनावरे मारून टाकण्यास त्याविरुद्ध मी माझा हात लांब केला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मानवाच्या मुला, एखाद्या देशाने माझ्या विरोधात पाप केले, त्यांच्या विरोधात मी माझा हात उचलेन, त्यांना अन्नाचा तुटवडा पडेल त्यांच्यावर दुष्काळ आणिन त्यांच्यातून मानव व पशू ह्यांना हुसकून देईन.