Ezekiel 14:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहात असते, तर मी त्यांचे रक्षण केले असते. ते तिघे स्वत: चे प्राण वाचवू शकले असते. पण माझ्या प्राणाची शपथ घेऊन मी प्रतिज्ञा करतो ते इतरांचे प्राण वाचवू शकले नसते. त्यांच्या मुला-मुलींनाही ते वाचवू शकले नसते. पापी देशाचा नाश केला जाईल.” परमेश्वर माझा प्रभू, हे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, त्यात ते तिघे असले तरी त्यांना पुत्रांचा किंवा कन्यांचा बचाव करता येणार नाही, त्यांचा मात्र निभाव लागेल, पण देश वैराण होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर सार्वभौम याहवेह घोषित करतात की माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते, परंतु देश ओसाड पडला असता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी त्यामध्ये ते तिघे असले तरी त्याचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही. मात्र त्याचा स्वतःचा बचाव होईल, मात्र देश ओसाड होईल असे परमेश्वर देव म्हणतो.