Ezekiel 14:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर नोहा, दानीएल व इयोब तेथे राहत असते, तर मी त्या तिघा सज्जानांना वाचविले असते. ते स्वत:चा प्राण वाचवू शकले असते पण माझी शपथ घेऊन वचन देतो की ते इतरांना म्हणजेच त्यांच्या मुलामुलींनासुध्दा वाचवू शकले नसते. त्या पापी देशाचा नाश केला जाईल” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, त्यात ते तिघे असले तरी त्यांना पुत्रांचा किंवा कन्यांचा बचाव करता येणार नाही, त्यांचा कायतो निभाव लागेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जिवाची शपथ, जरी हे तीन पुरुष त्यात असले, ते आपल्या स्वतःच्या मुला-मुलींना वाचवू शकले नसते. केवळ तेच वाचले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी हे तीन मनुष्य देशात असतील असे परमेश्वर देव म्हणतो, तरी ते त्यांचा मुलगा मुलगी ह्यांचा बचाव करु शकणार नाही, मात्र त्यांच्या जीवाचा बचाव होईल.