Ezekiel 14:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, हे लोक तुझ्याशी बोलायला आले आहेत. मला तू त्यांचा हिताच्या गोष्टी विचाराव्यास अशी त्यांची इच्छा आहे. पण अजूनही त्यांच्याजवळ त्या अमंगळ मूर्ती आहेत. त्यांना पाप करायला लावणाऱ्या ह्या गोष्टी त्यांनी जवळ बाळगल्या आहेत. ते अजूनही त्यांची पूजा करतात. मग ते सल्ला विचारण्यासाठी माझ्याकडे कशाला येतात? मी त्यांच्या प्रश्र्नंना उत्तर द्यावे का? नाही!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयांत आपल्या मूर्ती वागवल्या आहेत; त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवले आहे; अशा लोकांना मी आपल्याला प्रश्न विचारू देईन काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मानवपुत्रा, या माणसांनी आपल्या हृदयात मूर्ती बसविल्या आहेत आणि त्यांच्या मुखासमोर त्यांनी दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवले आहेत. त्यांना मी, मला प्रश्न विचारू द्यावा काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मानवाच्या मुला, या सर्व मानवांनी मूर्तींची उपासना केली व मनात त्यांना जागा दिली, त्यांनी आपल्या दृष्टी समोर पापाला अडखळण ठेवले आहे, अशा पापीष्ट लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारु देईन?