Ezekiel 14:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण उत्तर मी त्यांना देईन. मी त्यांना शिक्षा करीन. तू ह्या गोष्टी त्यांना सांगच. ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो : जर कोणी इस्राएली संदेष्ट्यामार्फत मला सल्ला विचारु लागला, तर संदेष्ट्याऐवजी मीच त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. जरी त्याच्याजवळ त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पापाला प्रवृत करणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बालगल्या आणि त्यांची तो अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. त्याच्याजवळ त्या अंमगळ मूर्ती असल्या, तरी मी त्याच्याशी बोलेन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो त्याला माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलमध्ये जेव्हा कोणी आपल्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्यासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग संदेष्ट्याकडे जातात, मी सार्वभौम याहवेह, स्वतः त्यांची मोठी मूर्तिपूजा लक्षात ठेवून त्यांना उत्तर देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकरिता त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तींच्या संख्येच्या मानाने मिळेल.