Ezekiel 14:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एखादा इस्राएली वा इस्राएलमध्ये राहणारा परका हिताच्या गोष्टीसाठी संदेष्ट्याकडे जाऊन माझा सल्ला काय आहे ते विचारू लागला, तर मी त्याला सल्ला देईन. त्याच्याजवळ जरी त्या घाणेरड्या मूर्ती असल्या, त्याला पाप करायला लावणाऱ्या गोष्टी त्याने जवळ बाळगल्या आणि तो त्यांची अजूनही पूजा करीत असला, तरी मी त्याच्या प्रश्र्नाला उत्तर देईन. आणि माझे उत्तर असे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल घराण्यातला व इस्राएलात वस्ती करून असलेल्या उपर्‍यांतला जो कोणी माझ्यापासून वियुक्त होऊन आपल्या हृदयात मूर्ती वागवतो, आपल्या पापाचे अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवतो व मला प्रश्‍न विचारण्यासाठी संदेष्ट्याकडे येतो, त्याला मी स्वतः मला योग्य वाटेल ते उत्तर देईन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘जेव्हा इस्राएलातील किंवा इस्राएलमध्ये राहत असलेला कोणी परदेशी स्वतःला माझ्यापासून वेगळे करतात आणि त्यांच्या हृदयात मूर्ती बसवितात आणि आपल्या मुखासमोर दुष्ट अडखळण्याचे धोंडे ठेवून मग माझ्याविषयी विचारण्यास संदेष्ट्याकडे जातात, त्यांना मी याहवेह स्वतः उत्तर देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या घराण्यातील प्रत्येकजण आणि इस्राएलात जे मला योग्य तेच आहे आणि ज्यांनी मूर्तीपुजेत अशा पापाचा अडखळण धोंडा आपल्या मनापासून आपल्यात वागवला. आणि माझा शोध घेण्यास भविष्यवक्तांकडे येतात, मी परमेश्वर देव आहे स्वतः त्यांना उत्तर देईन.