Ezekiel 14:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्याच्याकडे पाठ फिरवीन. मी त्याचा नाश करीन. तो इतरांसाठी एक उदाहरण होईल. लोक त्याला हसतील. माझ्या लोकांतून मी त्याला बाजूला काढीन. मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्याला विमुख होईन; त्याला मी विस्मय, चिन्ह व जननिंदा ह्यांचा विषय करीन व त्याचा माझ्या लोकांतून उच्छेद करीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी आपले मुख त्यांच्याविरुद्ध करेन आणि त्यांना एक चिन्ह व निंदेचा एक विषय असे करेन. मी त्यांना माझ्या लोकांमधून नाहीसे करेन, तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझे मुख त्याच्या पासून लपवीन, त्यांना चिन्ह व लोकांसाठी निंदेचा विषय करीन आणि माझ्या लोकांमधून त्यांना हुसकावून देईन, तेव्हा त्यांन समजेल की मी परमेश्वर देव आहे.