Ezekiel 15:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी त्या लोकांना शिक्षा करीन. पण काही लोक त्या अर्धवट जळालेल्या काटक्यांप्रमाणे असतील. त्यांना शिक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. ‘मीच त्यांना शिक्षा केली’ हे तुम्हाला दिसून येईल व मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांना विमुख होईन, ते अग्नीतून बाहेर पडले तरी अग्नी त्यांना खाऊन टाकील; मी त्यांना विमुख होईन, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझे मुख त्यांच्या दृष्टीआड करेन, जरी ते आग्नीतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल. मी त्यांच्या दृष्टीआड होईल तेव्हा तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे.