Ezekiel 16:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी भाकर, सपीठ, तेल व मध तुला देत असे व तुला भरवत असे, तीही तू त्यांच्यापुढे सुगंधी अर्पण ठेवलेस म्हणून हे असे घडत असे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुला दिलेले भोजन; म्हणजेच सपीठ, जैतुनाचे तेल आणि मध, जे मी तुला खायला दिले; ते तू सुवासिक धूप म्हणून त्यांना अर्पण केले. हे असेच घडले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भाकर, पिठ, तेल, मध मी तुला दिले व तुला खाऊ घातले ते तुझ्यापुढे सुवासीक अर्पण असे होते. असे घडले प्रभू परमेश्वर देव जाहीर पणे सांगतो.