Ezekiel 16:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस व त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी माझ्यापासून तुला पुत्र व कन्या ही झालीं, ती तू घेऊन त्यांना खाऊन टाकण्यासाठी बळी म्हणून अर्पण केलीस. ह्या तुझ्या शिंदळक्या तुला पुरेशा झाल्या नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘आणि ज्यांना माझ्यापासून जन्म दिला ते आपले पुत्र व कन्यांना तू मूर्तींना अन्न म्हणून अर्पण केले. तुझी वेश्यावृत्ती पुरेशी नव्हती काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुझ्या पुत्र कन्यांना जे माझ्यापासून जन्मले त्यांना तू खाऊन टाकण्यासाठी अर्पण केले आणि वेश्याकर्म केलेस.