Ezekiel 16:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक रस्त्याच्या सुरवातीला तू मातीचे ढिगारे रचलेस. तू तुझ्या सौंदर्याला कमीपणा आणलास, तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू तुझ्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला पकडण्यासाठी केलास. त्यांना तुझे पाय दिसावे म्हणून तू तुझी वस्त्रे वर उचललीस आणि त्यांच्याबरोबर वेश्येसारखी वागलीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू रस्त्यांच्या नाक्यानाक्यांवर आपली उंच स्थाने बांधलीस, आपले सौंदर्य भ्रष्ट केलेस, आल्यागेल्या सर्वांपुढे आपले पाय पसरून मनस्वी शिंदळकी केलीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक रस्त्याच्या कोपर्यावर तू आपली उच्च स्थाने बनविली आणि तिथून जात येत असलेल्या प्रत्येकासमोर आपले पाय पसरून वाढत्या व्यभिचाराने आपल्या सौंदर्याचा अवमान केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू पवित्र ठिकाण आपल्यासाठी प्रत्येक रस्त्यावर उभे केले आणि तुझे सौंदर्य जाहीर केले, तू आपले पाय पसरुन आपल्या मना प्रमाणे वेश्या कर्म केले.