Ezekiel 16:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तू अश्शूरकडे व्यभिचार करण्यासाठी गेलीस. पण तुझे समाधान होऊ शकले नाही. तुझी कधीच तृप्ती झाली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी तृप्ती म्हणून कधी होत नाही, ह्याकरता तू अश्शूर्यांबरोबरही शिंदळकी केलीस; हो, त्यांच्याबरोबर तू शिंदळकी केलीस तरीही तुझी तृप्ती होईना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू अधाशी होतीस म्हणून अश्शूरी लोकांबरोबर सुद्धा तू वेश्यावृत्ती केली; आणि त्यानंतरही तुझी तृप्ती झाली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू अश्शूरांशी वेश्या काम केले कारण त्यांने तू समाधानी झाली नाहीस. तू समाधान होईपर्यंत वेश्या काम करीत होतीस.