Ezekiel 16:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
‘परमेश्वर, माझा प्रभू, यरुशलेमला पुढील गोष्टी सांगतो, असे तू त्याना सांगितले पाहिजे. तुझ्या इतिहासावर नजर टाक. कनानमध्ये तुझा जन्म झाला. तुझे वडील अमोरी व आई हित्ती होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे म्हण, प्रभू परमेश्वर यरुशलेमेस म्हणतो, तुझे मूळ व उत्पत्ती ही कनान देशातली आहेत; तुझा बाप अमोरी व तुझी आई हित्तीण होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि म्हण, ‘सार्वभौम याहवेह यरुशलेमास असे म्हणतात: तुझे पूर्वज व तुझा जन्म कनानी लोकांच्या देशातील आहे; तुझा पिता अमोरी आणि तुझी आई हिथी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे जाहीर कर परमेश्वर देव यरूशलेमेला असे म्हणतो, तुझी सुरुवात आणि जन्म सुध्दा कनान देशात झाला आहे, तुझा बाप आमोरी आणि आई हित्ती होती.