Ezekiel 16:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “पण तू पूर्णपणे वेश्यावृत्ती पत्करली नाहीस. तू प्रत्येक रस्त्याच्या टोकाला मातीचे ढिगारे रचलेस व प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर पूजास्थाने बांधलीस. तू सर्व पुरुषांबरोबर व्यभिचार केलास. पण तू, वेश्येप्रमाणे, त्यांच्याजवळ मोबदला मागितला नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाक्यानाक्यांवर तू आपली कमानदार घरे बांधलीस व रस्त्यारस्त्यांनी उच्च स्थाने बांधलीस. पण तू शिंदळकीच्या वेतनाची पर्वा केली नाहीस, ह्यात तू वेश्येची रीत सोडलीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू जेव्हा प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावर तुझी वेश्यागृहे आणि प्रत्येक चौकात तुझी उच्च पूजास्थाने बांधली, तू एका वेश्येप्रमाणे नव्हती, कारण तू मोबदला नाकारला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रस्त्यावर, प्रत्येक नाक्यावर तू संस्कार गृह बांधले व सार्वजनिक ठिकाणी पवित्र ठिकाण उभे केलेस, तू वेश्याकमाई घेतली नाही व वेश्येचा रिवाज मोडला.