Ezekiel 16:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “तू पैसा खर्च केलास आणि तुझ्या प्रियकरांना आणि घाणेरड्या देवांना तुझे नग्न शरीर पाहू दिलेस, तुझ्याबरोबर व्याभिचार करु दिलास. तुझ्या मुलाना ठार मारुन त्यांचे रक्त खोट्या देवांना भेट म्हणून दिलेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, तू आपला पैका उधळलास,2 आपल्या जारांबरोबर शिंदळकी करून आपली लाज दाखवलीस, तू आपल्या मूर्तींशी अमंगळ कृत्ये केलीस आणि आपल्या मुलांचे रक्त त्यांना अर्पण केलेस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू तुझी वासना ओतली आणि स्वैरपणाने तुझ्या प्रियकरांसमोर तुझे नग्न शरीर उघडे केले आणि तुझ्या अमंगळ मूर्तींमुळे आणि तू तुझ्या लेकरांचे रक्त सांडले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे परमेश्वर देव म्हणतो, कारण तू आपल्या वासनेची ओतणी करुण निर्लज्जता तुझ्या वेश्याकर्माने जारकर्म्यावर व मूर्तीपुढे उघडी केली, आणि तू आपल्या लेकरांचे रक्त मूर्तीला वाहीले;