Ezekiel 16:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्या तुझ्या प्रियकरांच्या हाती तुला देईन. ते तुझे मातीचे ढिगारे उद्ध्वस्त करतील. तुझी पूजास्थाने जाळतील. तुझी वस्त्रे फाडतील आणि तुझे सुंदर अलंकार घेतील. मला तू ज्या अवस्थेत सापडलीस, त्याच अवस्थेत (उघडी व नग्न) तुला ते सोडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजे ते तुझी कमानदार घरे उद्ध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील; तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझे उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडीनागडी करून सोडतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा मी तुला तुझ्या प्रियकरांच्या हाती स्वाधीन करेन आणि ते तुझे घुमट पाडतील आणि तुझ्या उच्च पूजास्थानांचा नाश करतील. ते तुझी वस्त्रे उतरवतील आणि तुझे उत्तम दागिने घेऊन तुला अगदी पूर्णतः नग्न करून सोडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला मी त्यांच्या हाती सोपवेन व ते तुझे सर्व घरे पाडून टाकतील तुझे वस्त्र, दागिने हुसकावून तुला उघडी नागडी करतील.