Ezekiel 16:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू तुझ्या आईची मुलगी शोभतेस खरी! पतीची किंवा मुलांची तुला पर्वा नाही. तू अगदी तुझ्या बहिणीप्रमाणे आहेस. तुम्ही दोघीनी ही तुमच्या पतींचा व मुलांचा तिरस्कार केला. तू तुझ्या आईवडिलांसारखी आहेस. तुझी आई हित्ती तर वडील अमोरी होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या नवर्याचा व मुलांचा धिक्कार करणारी तुझी माता तिची तू कन्या; आपल्या नवर्याचा व मुलांचा धिक्कार करणार्या तुझ्या बहिणी त्यांची तू बहीण; तुझी आई पडली हित्तीण व बाप पडला अमोरी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू तुझ्या आईची खरी मुलगी आहेस, जिने तिच्या नवर्याचा व तिच्या लेकरांचा धिक्कार केला; आणि तुझ्या बहिणींची तू सख्खी बहीण आहेस, ज्यांनी त्यांच्या पतींचा व त्यांच्या लेकरांचा धिक्कार केला. तुझी आई हिथी होती आणि तुझा पिता अमोरी होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या आईची मुलगी आहेस, जिने आपल्या पतीचा व लेकराचा तिरस्कार केला व तुझ्या आपल्या बहीणीने बहीणीच्या पतीच्या व तिच्या लेकरांचा तिरस्कार केला, तुझी आई हित्ती आणि तुझा बाप आमोरी आहे.