Ezekiel 16:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेम, तू अगदी एकटी होतीस. कोणाला तुझ्यासाठी वाईट वाटले नाही वा कोणीही तुझी काळजी घेतली नाही. तू जन्मताच, तुझ्या आईवडिलानी तुला शेतात टाकून दिले. त्यावेळी तू रक्ताने माखलेली होतीस, तुझ्या अंगावर वारही तशीच होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझी करुणा येऊन ह्यांतले कोणतेही करावे अशी तुझ्यावर कोणाची दयादृष्टी झाली नाही; तर तू जन्मलीस तेव्हा तुला अमंगळ समजून शेतात टाकून दिले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्याकडे कोणी दयेने पाहिले नाही किंवा तुझ्यासाठी यापैकी कोणतीही गोष्टी करावी म्हणून कोणाला सहानुभूती आली नाही. तर तुला मोकळ्या मैदानात टाकून दिले होते, तुझ्या जन्माच्या दिवशीच तू तुच्छ मानली गेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कुणाच्या डोळ्यात तुझ्याबद्दल करुणा दिसली नाही, ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तुला मोकळ्या जागेत फेकून दिले.