Ezekiel 16:52 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तेव्हा आता तुला अपमान सहन केलाच पाहिजे. तुझ्या बहिणींना तुझ्या तुलनेत, तूच चांगले ठरविले आहेस. तू भयंकर गोष्टी केल्या आहेस, तेव्हा तुला लज्जित व्हावेच लागेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या बहिणीस आपल्याहून निर्दोष ठरवलेस ह्याची अप्रतिष्ठा तू भोग; तू त्यांच्याहून घोर पापे केल्यामुळे तुझ्या मानाने त्या अधिक निर्दोष मानल्या पाहिजेत; तुझ्या बहिणी अधिक नीतिमान आहेत हे तू दाखवलेस, म्हणून तू फजीत व लज्जित हो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींचे काही प्रमाणात समर्थन केले आहे. कारण तुझी पापे त्यांच्याहून अधिक घाणेरडी होती, तुझ्या बहिणी तुझ्यापेक्षा अधिक नीतिमान दिसतात. तर मग, लाज धर आणि आपला कलंक वाहून घे, कारण तू तुझ्या बहिणींना नीतिमान असे दाखविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विशेषत; तू आपली स्वतःची लाज दाखवलीस; या मार्गाने तू आपल्या बहीणीपेक्षा उत्तम आहेस हे दर्शविले, तू केलेल्या पापाने सर्व किळसवाणे कार्य तू केलेले आहेस, तुझी बहीण तुझ्याहून उत्तम आहे, विशेषत; तू आपली लाज उघडी केली, या मानाने तुझी बहीण तुझ्या मानाने उत्तम आहे.