Ezekiel 16:59 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “तू मला जसे वागवलेस, तसेच मी तुला वागवीन. तू आपल्या लग्नाचे वचन मोडलेस. आपल्यातील कराराचा मान राखला नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, तू स्वतः वाहिलेल्या शपथेस तुच्छ मानून आपला करार मोडलास; तू जसे केलेस तसे मी तुझे करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तू ज्यास पात्र आहेस, तसा व्यवहार मी तुझ्याशी करेन, कारण करार मोडून तू माझी शपथ तुच्छ मानली आहेस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो, मी इतरांशी जसा वागलो तसा मी तुझ्याशी वागेन ज्यांनी शपथेचा तिरस्कार केला व करार मोडला.