Ezekiel 16:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“त्याच वेळी मी तुझ्याजवळून गेलो. मी तुला रक्तात लोळताना व हातपाय हालविताना पाहिले. तू रक्ताने माखली होतीस. पण मी तुला म्हणालो, “जिवंत राहा” खरेच, तू रक्ताने माखलेली असूनसुद्धा मी म्हणालो “जिवंत राहा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुझ्याजवळून जाताना तुला आपल्या रक्तात लोळताना पाहिले, तेव्हा मी तुला म्हणालो, ‘तू आपल्या रक्तात लोळत आहेस तरी जिवंत राहा;’ असेच मी तुला म्हणालो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तेव्हा मी तिथून जाताना तुला तुझ्या रक्तात लोळताना पाहिले आणि तू तिथे तुझ्या रक्तात पडलेली असताना मी तुला म्हटले, “जिवंत राहा!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मी तुझ्या जवळून जातांना तुला रक्तबंबाळ पाहिले; आणि मी तुझ्या ओघळणाऱ्या रक्ताला जीवन बोललो.