Ezekiel 16:63 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुझ्याशी चांगले वागीन. मग तू माझे स्मरण ठेवशील आणि तू केलेल्या वाईट कृत्यांची तुला लाज वाटेल. तू जे काय केलेस, त्याबद्दल मी तुला क्षमा करीन. मग तुला पुन्हा लज्जित व्हावे लागणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू जे सर्व केलेस त्याची मी क्षमा करीन, म्हणजे मग तुला त्याचे स्मरण होऊन तू लज्जा पावशील आणि अप्रतिष्ठेमुळे तू पुन्हा आपले तोंड उघडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्यासाठी व जे सर्व तू केले त्यासाठी मी जेव्हा प्रायश्चित करेन, तेव्हा तुला आठवण होईल व लाज वाटेल आणि अवमानामुळे पुन्हा कधी आपले मुख उघडणार नाहीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या बाबीमुळे तुला सर्व काही स्मरण होईल आणि त्याची लाज वाटेल तू केलेल्या सर्व कर्माची मी तुला क्षमा केली, “असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.”