Ezekiel 16:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शेतातल्या रोप्याला जगवावे, तसे तुला जगवायला मी मदत केली. तू वाढत गेलीस आणि तरुणी झालीस. तू वयात आलीस, तुझ्यात तारुण्याची लक्षणे दिसू लागली. तुझे केसही वाढू लागले, पण तरीसुद्धा तू विवस्त्रच होतीस, उघडीच होतीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेतातले बीज वाढून सहस्रपट होते तशी मी तुझी वृद्धी केली; तू वाढून उंच झालीस, तू अति सुंदर झालीस, तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले तरी तू उघडीनागडी होतीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेतातील रोपट्याप्रमाणे मी तुला वाढवले. तू वाढून मोठी होऊन वयात आलीस. तुझे स्तन विकसित झाले आणि तुझे केस वाढले, तरीही तू नग्नच होतीस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला भूमीतील रोपासारखे पेरले. तू बहुगुणीत झालीस. आणि मोठी झालीस, व तू आभुषणांचा दागीना झालीस, तुला उर फुटले आणि केस दाट झाले, तू बिनवस्त्र होती.