Ezekiel 16:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तुला पाखरले. तू प्रणयोत्सुक झाली होतीस. म्हणून माझे वस्त्र तुला लपेटून मी तुझी नग्नता झाकली. मी तुला लग्नाचे वचन दिले. मी तुझ्याबरोबर करार केला आणि तू माझी झालीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘नंतर मी तिथून गेलो आणि जेव्हा मी तुला पाहिले आणि मला दिसले की तू प्रीती करण्याच्या वयात आली होतीस, तेव्हा मी आपल्या वस्त्राचा कोपरा तुझ्यावर पसरून तुझे नग्न शरीर झाकले. तुला मी आपली पवित्र शपथ देऊन तुझ्याशी करार केला आणि तू माझी झालीस, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी पुन्हा तुझ्या जवळून गेलो, तेव्हा वेळ तुझ्या प्रेमाच्या विकासाची होती, तेव्हा मी तुझ्यावर पांघरुन घालून तुझी नग्नता झाकली. मग मी शपथ वाहून तुझ्याशी करार केला. परमेश्वर देव म्हणतो, या कराराने तू माझी झाली आहेस.