Ezekiel 17:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“इस्राएलच्या लोकांना ह्या गोष्टीचा अर्थ समजावून सांग. ते नेहमीच माझ्याविरुद्ध जातात. त्यांना पुढील गोष्टी सांग. पहिला गरुड म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय. तो यरुशलेमला आला आणि त्याने राजाला व इतर नेत्यांना आपल्याबरोबर बाबेलला नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ह्या बंडखोर घराण्याला सांग, ह्या गोष्टी काय आहेत हे तुम्हांला समजत नाही काय? त्यांना सांग की, पाहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार ह्यांना धरले व आपणाकडे बाबेल येथे आणवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंडखोर घराण्याशी बोल या गोष्टी काय आहे ते तुला माहित नाही का? पाहा! बाबेलचा राजा यरूशलेमकडे येईल त्यांचा राजा आणि राज पुत्राला घेऊन, बाबेलात जाईल.