Ezekiel 17:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण शेवटी कसेही करुन ह्या नव्या राजाने नबुखद्नेस्सराविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केलाच. त्याने आपले दूत पाठवून मिसरकडे मदत मागितली त्यांना पुष्कळ घोडे व सैनिक मागितले. यहूदाचा नवा राजा ह्यात यशस्वी होईल, असे तुम्हाला वाटते का? नव्या राजाकडे करार मोडून शिक्षेतून सुटका करुन घेण्याइतके सामर्थ्य आहे, असे तुम्हाला वाटते का?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्याने त्यांच्याविरुद्ध फितुरी करून मिसर देशाने आपणास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून त्याच्याकडे आपले जासूद पाठवले. त्याला यश मिळेल काय? ज्याने अशी गोष्ट केली तो निभावेल काय? त्याने करार मोडला आहे तरी तो निभावेल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मिसऱ्यांनी त्यास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून तो आपला राजदुत पाठवून त्याजविरूद्ध बंड करेल तो यशस्वी होईल का? या गोष्टी करणाऱ्याची सुटका होईल का? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याची सुटका होईल का?