Ezekiel 17:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी माझ्या प्राणाची शपथ घेऊन सांगतो की नवा राजा बाबेलमध्येच मरेल. नबुखद्नेस्सरने ह्या माणसाला यहूदाचा नवा राजा केले. पण त्या माणसाने नबुखद्नेस्सरला दिलेले वचन मोडले. त्याने कराराकडे दुर्लक्ष केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ज्याने त्याला राजा केले, ज्याच्याशी केलेली आणभाक त्याने तुच्छ मानली, ज्याचा करार त्याने मोडला, त्या राजाच्या निवासस्थानी, बाबेलात तो मरेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, तो बाबेलमध्ये, ज्याने त्याला राजासनावर बसविले, ज्याची शपथ त्याने तुच्छ मानली आणि ज्याचा करार त्याने मोडला, त्याच राजाच्या देशात तो मरेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या जीवताची शपथ असे परमेश्वर देव जाहीर करतो तो निश्चित राज्याच्या भूमीत मरेल ज्याने त्यास राजा केले, ज्या राजाने करार केला ज्याने त्यास तुच्छ लेखून करार मोडला. तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल.