Ezekiel 17:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, “उंच गंधसरुची एक फांदी मी तोडून घेईन. शेड्याची डहाळी मी घेईन आणि मी स्वत: उंच पर्वतावर ती लावीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, “मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डाहळी तोडून ती लावीन, त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यांतली एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी एका गंधसरूचा सर्वात उंच शेंडा घेऊन तो लावेन; मी त्याचा अगदी वरचा लवचिक शेंडा तोडेन आणि तो सर्वात उंच व मोठ्या पर्वतावर लावेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर देव हे म्हणतो, मग मी स्वतःला देवदार झाडाच्या उच्च ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्यांचे रोपन करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वतःला उच्चस्थानी स्थापील.