Ezekiel 17:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी स्वत:, ती फांदी, इस्राएलच्या उंच पर्वतावर लावीन. मग त्या फांदीचा वृक्ष होईल. त्याला फांद्या फुटून फळे येतील. तो एक सुंदर गंधसरुचा वृक्ष असेल. त्याच्या फांद्यांवर खूप पक्षी बसतील. त्याच्या सावलीला खूप पक्षी राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी इस्राएलाच्या उंच पर्वतावर ती लावीन; तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल; म्हणजे मग त्याच्याखाली सर्व पक्षिकुळे राहतील; त्याच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलच्या उंच पर्वतावर मी तो लावेन; त्याला फांद्या फुटतील व ते फळ देईल आणि ते वैभवी गंधसरू बनेल. प्रत्येक प्रकारचे पक्षी त्यात घरटे बनवतील; त्यांना त्या गंधसरूच्या फांद्यांच्या छायेत आसरा मिळेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना इस्राएलाच्या पर्वतावर रोपन करेल व त्यांना फांद्या, फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात्त होतील म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली राहतील, ते त्यांच्या फांद्यांमध्ये घरटे करतील.