Ezekiel 17:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग दुसऱ्या झांडाना समजेल की मी उंच वृक्ष जमीनदोस्त करतो आणि लहान झांडांचे उंच वक्ष करतो. मीच हिरवीगार झाडे सुकवून टाकतो, व सुकलेल्या झाडांना पालवी फुटवितो. मी परमेश्वर आहे. मी बोलतो, तेच करतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वनांतील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीच वृक्षास उंच केले आहे, आणि हिरव्या झाडास सुकवले आहे व शुष्क झाडास फलद्रूप केले आहे; मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेही आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रानातील सर्व झाडे जाणतील की मी याहवेह उंच झाडांना वाकवितो आणि वाकलेल्या झाडांना उंच वाढवतो. हिरव्या झाडांना मी वाळवितो आणि वाळलेल्या झाडांना भरभराटीस आणतो. “ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी हे करणारच.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सर्व झाडाच्या पक्षांना कळेल की मी परमेश्वर देव आहे, मी उच्च झाड खाली आणेन; मी लहान झाडाला उच्च करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन; कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे, मी जे जाहीर केले आहे ते घडेल.