Ezekiel 17:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मोठे पंख असलेल्या, दुसऱ्या मोठ्या गरुडाने हा वेल पाहिला. त्या गरुडला खूप पिसे होती. ह्या नव्या गरुडाने आपली काळजी घ्यावी, असे द्राक्षवेलीला वाटत होते. म्हणून तिने आपली मुळे गरुडाकडे वळविली. तिच्या फांद्या त्याच्या दिशेने पसरल्या. ज्या मळ्यात ती वेल लावली होती, त्या मळ्यापासून फांद्या वाढून दूर गेल्या. नव्या गरुडाने आपल्याला पाणी द्यावे असे द्राक्षवेलीला वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुसरा एक मोठा गरुड होता, त्याला फार पिसे होती व मोठाले पंख होते; पाहा, त्याने लावलेल्या वाफ्यांतून आपणास पाणी मिळावे म्हणून त्या द्राक्षवेलीने आपली मुळे त्याकडे वाकवली व आपल्या फांद्या त्याकडे झुकवल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तेथे अजून एक मोठा गरुड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता आणि पाहा! या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्यांच्या फांद्याही गरुडाकडे पसरलेल्या होत्या, त्यास रोपन केल्या पासून त्यास विपुल पाणी घातले होते.