Ezekiel 17:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती द्राक्षवेल सुपीक मळ्यात लावली होती. तिच्या जवळपास पुष्कळ पाणी होते. तिला खूप फांद्या फुटून चांगली फळे धरु शकली असती. ती एक उत्तम वेल झाली असती.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या रोप्यास फांद्या फुटून तो फळास यावा आणि त्याची भव्य द्राक्षवेल व्हावी म्हणून तो एका सुपीक मळ्यात विपुल पाण्याजवळ लावला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास सुपीक जमीनीत विपुल पाण्याजवळ रोपण केलेले होते त्यामुळे त्यांच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले, त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली.