Ezekiel 17:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला: “ती वेल यशस्वी होईल असे तुम्हाला वाटते का? नाही! नवा गरुड तो उपटून टाकील. पक्षी तिची मुळे तोडेल व तो सर्व द्राक्षे खाऊन टाकील. मग कोवळी पाने सुकून गळून पडतील. ती वेल सुकत जाईल. तिला मुळापासून उपटण्यास बळकट हातांची व सामर्थ्यवान राष्ट्रांची गरज लागणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, सांग बरे, ती जीव धरील काय? ती सुकून जावी म्हणून तिला मुळासकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत काय? तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल; तिची मुळे उपटून टाकायला मोठे सामर्थ्य आणि पुष्कळ लोक लागणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे घडेल का? लोकांस असे सांगा परमेश्वर देव हे म्हणतो; त्याचे मुळ उपटून टाकू नका; आणि त्याची फळे तोडू नका, त्यांची वाढ सुकून जाईल; कोणतेही बाहूबल कोणताही जनसमुदाय त्यास उपटून टाकणार नाही.