Ezekiel 18:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो गरीब असहाय्य लोकांना वाईट वागणूक देत असेल, लोकांचा गैर फायदा घेत असेल, गहाण ठेवलेल्या वस्तू कर्जफेडीनंतर कर्जदाराला परत करीत नसेल, तो त्या अमंगल मूर्तीची प्रार्थना करीत असले आणि आणखी काही भयंकर गोष्टी करीत असेल. अशा कितीतरी वाईट गोष्टी तो करीत असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लाचार व दुबळे ह्यांच्यावर जुलूम केला, कोणास लुटले, कर्जदाराचे गहाण त्याला परत केले नाही, मूर्तीकडे पाहिले, अमंगल कृत्य केले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गरीब व गरजवंतावर तो अत्याचार करतो. तो इतरांना लुटतो. उसने देताना घेतलेले गहाण परत करीत नाही. तो मूर्तींकडे आपली नजर लावतो. तो अमंगळ कृत्ये करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने गरजू व गरीबांवर दडपशाही केली जर त्याने जप्ती आणली आणि चोरी केली आणि त्याचे वचन पाळले नाही, घेतलेले परत केले नाही, जर त्याने आपली नजर मूर्तीकडे लावून तिरस्कार आणणारे काम केले.