Ezekiel 18:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो गरिबांना मदत करतो गरजूला पैसे उसने दिल्यास, त्यावर व्याज घेत नाही. तो माझे नियम पाळतो त्याचप्रमाणे वागतो. त्याच्या वडिलांच्या पापांसाठी, चांगल्या मुलाला मृत्युदंड मिळणार नाही. तो मुलगा जिवंत राहील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दीनाची हानी करण्यापासून आपला हात आवरतो, वाढीदिढी करत नाही, व्याज घेत नाही, माझे निर्णय पाळतो, माझ्या नियमांप्रमाणे चालतो, तो आपल्या बापाच्या अधर्मामुळे मरायचा नाही, तो खातरीने वाचेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो गरिबांचे वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि त्यांच्याकडून व्याज किंवा नफा घेत नाही. तो माझे नियम आचरतो व माझे विधी पाळतो. तो आपल्या पित्याच्या पापासाठी मरणार नाही; तर तो खचितच जगेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गरीबांना नाडण्यास त्याने जर आपला हात आखुड केला आणि त्याने व्याज घेतले नाही व अन्यायाने नफा घेतला नाही, त्याने माझे फर्मान मान्य केले आणि माझ्या दर्जानुसार चालला, तर तो आपल्या वडिलाच्या पातकासाठी मरणार नाही. तो निश्चित जगेल.