Ezekiel 18:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुम्ही कदाचित् विचाराल ‘वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा का होणार नाही?’ कारण मुलगा प्रामाणिक होता व त्याने सत्कृत्ये केली. त्याने माझ्या आज्ञा काळजीपूर्वक पाळल्या. म्हणून तो जगेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी तुम्ही म्हणता, बापाच्या दुष्कर्माचा भार पुत्राने का वाहू नये? हे पाहा, मुलगा न्यायाने व नीतीने वागला, त्याने माझे सर्व नियम पाळून त्याप्रमाणे वर्तन केले तर तो खातरीने वाचेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तरीही तुम्ही विचारता, ‘मुलगा आपल्या पित्याचा दोष का वाहत नाही?’ मुलाने जे सरळ व योग्य ते केले व काळजीपूर्वक माझे सर्व विधी आचरले, म्हणून तो खचितच जगेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तू म्हणतोस “वडिलाच्या दुष्कर्माचा भार मुलाने का बरे वाहू नये?” कारण मुलगा आपला न्याय भरुन पावला व नीतिने वागला आणि त्याने माझे सर्व नियम पाळले; त्याने त्याची कृती केली, तो निश्चित जगेल.