Ezekiel 18:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो डोंगरावर जात नाही व खोट्या देवांना दाखवलेले नैवेद्य खात नाही, इस्राएलमधील अमंगल मूर्तीची तो प्रार्थना करीत नाही. तो शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करीत नाही, आपल्या स्वत:च्या बायकोच्या मासिक पाळीच्या वेळी तिच्याजवळ जात नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
डोंगरावर भोजन करीत नाही, इस्राएल घराण्याच्या मूर्तीकडे डोळे लावत नाही, आपल्या शेजार्याच्या स्त्रीला भ्रष्ट करीत नाही, ऋतुमती स्त्रीजवळ जात नाही,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही. तो आपल्या शेजार्याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्यास पवित्र पर्वतावर खाण्यासारखे काही नाही आणि त्याने आपले डोळे वर इस्राएलाच्या मूर्तीकडे लावले नाही, जर त्याने आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला भ्रष्ट केले नाही किंवा रुतुमती काळात स्त्रीकडे गेला नाही.