Ezekiel 18:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो सज्जन लोकांचा फायदा घेत नाही, कर्ज देताना गहाण ठेवलेल्या वस्तू, तो कर्जाची परतफेड होताच कर्जदाराला परत करतो. तो सज्जन भुकेलेल्यांना अन्न देतो, गरजूंना कपडे देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो कोणावर अत्याचार करीत नाही, तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. जो लुटत नाही तर आपले अन्न भुकेल्यांस देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर त्याने कुणावरही दडपशाही केली नाही पण त्याने आपल्या कर्जदाराकडून शपथ वाहून घेतली जे त्याने चोरले होते ते त्याने घेतले नाही, पण त्या बदल्यात त्याने भुकेल्यांना अन्न दिले आणि नग्न लोकांना कपडे घातली.