Ezekiel 19:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तिच्या फांद्या खूप वाढल्या. त्या हातातील काठ्यांप्रमाणे व राजदंडाप्रमाणे झाल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अधिपतीची राजवेत्रे होण्याजोगे तिला मजबूत धुमारे आले; ती उंच वाढून तिने मेघांना भेदले व तिच्या बहुत शाखांसहित ती उंचीने मोठी दिसत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्या फांद्या मजबूत असून, अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य होत्या. झाडाच्या दाट पानांच्या वर त्या उंच वाढल्या, तिची उंची व तिच्या पुष्कळ फांद्यांमुळे ती उल्लेखनीय दिसत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती.